ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट सेवांच्या जोरावर निरंतर प्रगतीपथावर असणारी आपली हक्काची बँक!
सन २००० पासून तोट्यात असणारी बँक, विद्यमान चेअरमन माजी आमदार **मा. श्री. बबनराव शिंदे** यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली आणि सर्व सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अल्पवधीतच नफ्यात आली. बँकेची सर्वांगीण प्रगती व विकास अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेले क्षमतेचे सर्व निकष माढेश्वरी बँकेने यावर्षीही यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) **२१.०२%** इतके मजबूत आहे. तसेच यावर्षी बँकेने थकीत कर्जाची १००% तरतूद करून **सलग ५ व्या वर्षी शून्य टक्के (0%) NPA** राखण्याचा विक्रम केला आहे.
"ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल आहे. सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध बँकिंग सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय."
माजी आमदार चेअरमन बबनराव (बबनदादा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर विकास.
पारदर्शक कामकाज आणि उद्दिष्टपूर्तीबद्दल जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवीत.
पंढरपूर व लोणी-काळभोर शाखेतून महिला बचत गटांना भरीव कर्ज पुरवठा व उत्कृष्ट वसुली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
सध्या बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
मुख्य शाखेंसह सोलापूर जिल्ह्यात ८ शाखा आणि पुणे जिल्ह्यात १ शाखा उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत.
टेंभूर्णी शाखेसाठी सुसज्ज व अद्ययावत स्वरूपाची २ मजली इमारत बांधून ग्राहकांसाठी आधुनिक सेवा उपलब्ध केली आहे.
माढा तालुक्यासह सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये लवकरच नवनवीन अद्ययावत शाखा सुरू करण्याचा मानस आहे.
माढेश्वरी बँकेच्या वतीने आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
मागील ६ वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे ५०० वारकरी व भाविक भक्तांची मोफत निवासाची, भोजनाची व चहा-पाण्याची उत्तम सोय बँकेतर्फे केली जाते.
बँकेची सुरू असलेली यशस्वी घोडदौड ही चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच शक्य झाली आहे.