एकूण ठेवी
₹२५३.८३ कोटी
३१/०३/२०२६ अखेरकर्जाचे वाटप
₹१४३.०४ कोटी
३१/०३/२०२६ अखेरएकूण गुंतवणूक
₹ १३१.३ ९कोटी
सरकारी व इतर बँकानिव्वळ एन.पी.ए.
०.०० % (शून्य)
उत्कृष्ट वसुलीभांडवल पर्याप्तता (CRAR)
२१.०२ %
९% पेक्षा अधिकसभासद व भाग भांडवल
बँकेच्या नेत्रादीपक प्रगतीमध्ये सभासदांचाही मोठा सिंहाचा वाटा असतो. सभासदांच्या सक्रीय सहभागामुळे दिनांक ३१/०३/२०२६ अखेर बँकेची सभासद संख्या १०,९९० असून बँकेचे वसूल भाग भांडवल ₹ ७७६.३१ लाख इतके आहे.
राखीव व इतर निधी: बँकेचा राखीव व इतर निधी मार्च २०२६ अखेर
₹ ३,०३३.५२ लाख इतका झालेला आहे.
ठेवी व विमा सुरक्षा
स्पर्धेच्या युगात खातेदारांना चांगली सेवा देऊन ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत
एकूण
₹ २५,३८२.८१ लाख इतक्या ठेवी बँकेकडे जमा आहेत.
सुरक्षित गुंतवणूक
मा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार कर्ज-रोखे यामध्ये बँकेने
₹ ८,४९३.६३ लाख इतकी गुंतवणूक केली आहे.
तसेच राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये ₹ ४,६४५.७२ लाख इतकी गुंतवणूक केलेली आहे.
कर्जव्यवहार व वसुली
राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य कारणासाठी पुरेसे तारण घेऊन दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ₹ १४,३०४.२३ लाख कर्जाचे वाटप केले आहे.
- सी.डी. रेशो (C.D. Ratio): ५६.३५ %
- निव्वळ एन.पी.ए. (Net NPA): ० % (शून्य टक्के)
- अग्रक्रम क्षेत्र (Priority Sector): १२५.६३ % वाटप
- दुर्बल घटक (Weaker Section): १७.६१ % वाटप
CRAR व ऑडीट वर्ग "अ"
भांडवल पर्याप्तता (CRAR): रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार CRAR चे प्रमाण ९% ठेवणे आवश्यक आहे. आपल्या बँकेने दिनांक ३१/०३/२०२६ अखेर हे प्रमाण २१.०२ % इतके उत्कृष्ट ठेवले आहे.
वैधानिक लेखापरीक्षण: सन २०२५-२६ सालासाठी वैधानिक लेखापरीक्षक श्री. किरण नागेश अँड असोसिएट्स, सोलापूर यांनी लेखापरीक्षण पूर्ण करून बँकेला ऑडीट वर्ग "अ" दिलेला आहे.
समवर्ती/अंतर्गत लेखापरीक्षण विजय गपाट अँड असोसिएट्स, बार्शी यांनी पूर्ण केले असून समाधान व्यक्त केले आहे.
सेवक वर्ग व सेफ डिपॉझिट लॉकर सेवा
बँकेचे एकूण ३५ कर्मचारी असून वसुलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावून, एन.पी.ए. चे प्रमाण शून्य [० %] राखण्यास मदत केली आहे.
सेफ डिपॉझिट लॉकर उपलब्ध शाखा:
माढा, टेंभूर्णी, पंढरपूर, लोणी काळभोर, सोलापूर, कुर्डूवाडी, करमाळा आणि मोडनिंब शाखेत सेफ डिपॉझिट लॉकर सेवा सुरू आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
नफा वाटणी
दि. ३१/३/२०२६ या चालू आर्थिक वर्षातदि. ३१/३/२०२६ या चालू आर्थिक वर्षात बँकेस रु. ३,०५,४७,९०८.१९ पैसे इतका निव्वळ नफा झालेला आहे . त्याचा विनियोग खालील प्रमाणे करावा, अशी संचालक मंडळाची शिफारस असून त्यास या सभेची मंजुरी मिळावी अशी विनंती आहे .
| अ.क्र. | निधीचा तपशील | रक्कम (रु.) | अ.क्र. | निधीचा तपशील | रक्कम (रु.) |
|---|---|---|---|---|---|
| १) | राखीव निधी | ८२,४०,८८८.१९ | ५) | गुंतवणूक चढ उतार निधी | ५,००,०००.०० |
| २) | लाभांश (९% प्रमाणे) | ५७,०६,२२०.०० | ६) | तंत्रज्ञान विकास निधी | ३०,००,०००.०० |
| ३) | इमारत निधी | १,१०,००,०००.०० | ७) | सभासद कल्याण निधी | १,००,०००.०० |
| ४) | गुंतवणूक घसारा निधी | १५,००,०००.०० | ८) | सभासद शिक्षण व प्रशिक्षण निधी | ५,००,०००.०० |
| एकूण निव्वळ नफा: | रु. ३,०५,४७,९०८.१९ | ||||
सामाजिक उपक्रम
सामाजिक उपक्रम बँकेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबीर, नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबीर, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
तसेच बँकेने एक वा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन केलेल्या अनेक सभासदांच्या मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे .
संगणकीकरण व डिजिटल सेवा
संगणकीकरण बँकेने सभासद व खातेदारांना चांगली व जलद सेवा द्यावी या दृष्टीने ऑनलाईन सेवा मागील २४ वर्षांपासून देत असून याद्वारे चांगली सेवा देऊन ग्रामीण भागात एक आदर्श निर्माण केला आहे.
तसेच दिनांक १ जानेवारी २०१४ पासून बँकेने सी.बी.एस. (Core Banking Solution) द्वारे सेवा देऊन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात बँकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.